सिल्लोड तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित

गंगाखेड [ अंजली साबळे ]  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई यांच्या वतीने स्व.वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ औरंगाबाद विभागाचा पुरस्कार सिल्लोड तालुका पत्रकार संघास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर, गंगाखेडचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टेजी, श्री. विलास बडेजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सिल्लोड पत्रकार संघाचे सचिन चौबे , निलेश सोनटक्के ,राजू वैष्णव , अनिल कुलकर्णी, रवी सोनवणे , संजय कुलकर्णी आदीसह इतर पदाधिकार्याची उपस्थिती होती