राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते खेळणातील गाळ काढण्याचा शुभारंभ

 सिल्लोड [ डॉ. सचिन साबळे ] महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शनिवार ( दि.7 ) रोजी खेळणा मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचा शुभारंभ संपन्न झाला . शासनाच्या वतीने गाळ काढण्यासाठी पोकलेन यंत्राची मोफक्त सुविधा देण्यात आली आहे. सुपीक शेती करण्यासाठी फायदेशीर ठरणारा हा गाळ शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला असून या संधीचा फायदा घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावा असे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

 

      यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवरनगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन,अकिल वसईकर , राजू गौर, बबलू पठाण, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, माजी पं.स.सदस्य मधुकर गवळी, संजय काळात्रे, नायब तहसीलदार प्रभाकर गवळी, नगर परिषदेचे अधिकारी सुनील गोराडे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता डिगंबर रायबोले, शाखा अभियंता प्रीतम राठोड यांच्यासह पालोद चे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, रमेश पालोदकर, अशोक पालोदकर, लिहाखेडी सरपंच नामदेव साखळे, महेंद्र बावस्कर, रघुनाथ कल्याणकर, सुनील लांडगे, स्वप्नील शेळके आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

 

     खेळणा मध्यम प्रकल्पातून सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा होतो. या धरणातील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल. शनिवार रोजी एक पोकलेन यंत्रांद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. गाळ काढण्यासाठी शासनाने पोकलेन ची सुविधा मोफत दिली आहे. शेतकऱ्यांकडून गाळाची मागणी वाढल्यास यंत्रसामुग्री वाढविण्यात येईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

———————————————–

      *खेळणातील गाळ शेतीसाठी उपयुक्त*

 

     यावर्षी अतिवृष्टीमुळे तलावात पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेला गाळ हा इतर सर्व खतांपेक्षाही जास्त उपयुक्त असून शेतात गाळ टाकल्यानंतर शेतातील सुपीकता वाढण्यास मदत होते. तसेच उत्पादनही वाढते असे कृषी तज्ञांचे मत आहे. राज्य शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

——————————-

*धरणातील संपादीत क्षेत्राची सीमा निश्चित करावी*

    

     अधिकाऱ्यांनी खेळणा धरणातील संपादीत क्षेत्राची सीमा निश्चित करून संपादित क्षेत्रातील गाळ काढावे असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. जेणे करून येथील लाभ क्षेत्र वाढेल व त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पिके घेता येईल असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.