सिल्लोड क्रिकेट अकादमीच्या चार खेळाडूची महाराष्ट्र लीगसाठी निवड.

 

सिल्लोड [ अंजली साबळे ] – सिल्लोड येथील क्रिकेट अकादमी च्या वतीने खेळाडूंना प्रशिक्षक अमजद पठाण यांनी तंत्र शुद्ध प्रशिक्षण देन्यात येत आहे. या अकादमी तील  समीर शेख, करण सिंग राजपूत , फरहान शेख, हर्षवर्धन गावंडे चार खेळाडूची महाराष्ट्र क्रिकेट लीग साठी निवड करण्यात आली आहे.  मुंबई, नागपूर व पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट लीग चे विविध सामने खेळले जाणार आहे. सिल्लोड अकादमी मधील फलंदाज समीर शेख, यष्टीरक्षक करणसिंग राजपुत्र , जलद गोलंदाज फरहान शेख, फलंदाज हर्षवर्धन गावंडे हे खेळाडू अमरावती, औरंगाबाद व पुणे येथे झालेल्या चाचणी सामन्यातून याचे क्रीडा कौशल गुणवंत्ते वरून निवड करण्यात आली आहे. याकामी त्यांना मुख्य प्रशिक्षण अमजद पठाण यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. या निवडू बद्दल त्याचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.