राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी प्रेसिडेंट इस्टेट येथे अद्ययावत केलेल्या आयुष वेलनेस केंद्राचे केले उदघाटन

नवी दिल्ली [ अंजली साबळे ] येथील प्रेसिडेंट इस्टेट मध्ये अद्ययावत केलेल्या आयुष वेलनेस केंद्राचे उदघाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई आणि इतर मान्यवर  उपस्थित होते.देशाच्या प्रथम महिला नागरीक म्हणून सन्मानित असलेल्या श्रीमती सविता कोविंद या देखील या उदघाटन सोहळ्याला उपस्थित होत्या.

आयुष मंत्रालय आणि राष्ट्रपती सचिवालय यांचा संयुक्त उपक्रम म्हणून 25 जुलै 2015 रोजी प्रेसिडेंट इस्टेट येथे आयुष वेलनेस केंद्र (AWC) सुरू झाले.  या केंद्रात मध्ये आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या वैद्यकीय सेवाप्रकारांच्या उपचार सुविधा  उपलब्ध आहेत. त्यातून राष्ट्रपती, राष्ट्रपती सचिवालयातील अधिकारी आणि राष्ट्रपती इस्टेटमधील रहिवाशांना वैद्यकीय सेवा पुरविल्या जातात.  आयुष प्रणालीच्या सुविधांसह अद्ययावत पायाभूत सुविधा उपचारांच्या मानक प्रणालींचे येथे पालन केले जाईल.

 

राष्ट्रपती भवनात आयुष वेलनेस केंद्राची तपशीलवार माहिती देणाऱ्या “स्थापना, कार्यप्रणाली आणि महत्त्वाचे टप्पे” या विषयावरील पुस्तकाचे आज राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयुष राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई कालूभाई यांच्या हस्ते प्रकाशन झाले.त्यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि राष्ट्रपतींचे सचिव. के डी त्रिपाठी,उपस्थित होते

“या केंद्राचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतला आहे,हे जाहीर करताना मला आनंद होत आहे,”असे या प्रकाशनाची प्रशंसा करताना राष्ट्रपतींनी पुस्तकासाठी दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे.या केंद्राने राबविलेल्या रुग्ण प्रशिक्षण कार्यशाळा, शालेय आरोग्य कार्यक्रम आणि लोकोपयोगी बाह्य रुग्ण विभाग इत्यादी उपक्रमांचे कौतुक होत आहे.  कोविड-19 महामारीच्या काळात सुरू झालेल्या टेलिमेडिसिन सुविधा आणि ऑनलाइन योग वर्गामुळे या कठीण काळात लाभार्थ्यांना मदत झाली असेही या संदेशात म्हटले आहे.