पिंपरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

पिंपरी [ डॉ.सचिन साबळे ] राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबविण्यात आले असून पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात  रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले. यावेळी विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचे  मा अध्यक्ष अमितजी गोरखे , मा नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे  , जिल्हा चिटणीस गणेश आर ढाकणे , महिला मोर्चा उपाध्यक्ष अनिताताई वाळुंजकर  शहर कार्यकारणी सदस्य गणेश भाऊ वाळुंजकर , पिंपरी प्रभाग अध्यक्ष जयेश भाई चौधरी, मदन गोयल, ओमप्रकाश शर्मा, गौरव वाळुंजकर आदी प्रमुख पदाधिकारी  उपस्थित होते.A