सिल्लोड शहर भाजपा तर्फे ‘चाय पे चर्चा’

सिल्लोड [ डॉ.सचिन साबळे ] गेले काही दिवस राज्यात सत्तांतराचे वारे सुरु होते. या काळात राज्यात अनेक अकल्पनीय घटना घडल्या. सर्वच पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यां सहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या परिवर्तनाकडे लागले होते. त्यामुळे या काळात स्थानिक स्तरावर भेटी, बैठका, निवेदन, आंदोलन, इत्यादी सर्वच बाबतीत शांतता होती. याशिवाय पेरणीचा काळ, आषाढी निमित्त पंढरपूर वारी इत्यादी सर्वच कारणामुळे गेल्या दीड- दोन महिन्यापासून पदाधिकऱ्यांची एकत्र भेट नव्हती. या परिस्थिती तून मार्ग काढत भाजपा सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांसाठी ‘चाय पे चर्चा’ या विशेष बैठकीचे आयोजन आर. एल. पार्क येथील कार्यालयात केले होते. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत सोबत न्याहरी व चहा चा आस्वाद घेतला. नेहमीच्या राजकीय विषयांची चर्चा बाजूला ठेवून कौटुंबिक संवाद, गप्पा, विनोद यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, नगरसेवक मनोज मोरेल्लू यांनी आस्थेने शाखा पदाधिकाऱ्यांची विचारपूस केली, यावेळी युवा मोर्चाचे सुनील मिरकर,माजी नगरसेवक विष्णू काटकर, दादाराव आळणे, मधुकर राऊत, व्यापारी आघाडीचे प्रशांत चिनके, भाऊ गोमटे, ओबीसी मोर्चाचे नंदकुमार श्रीवास्तव, अतुल साळवे, अनमोल ढाकरे, मधुकर जाधव, मोतीराम मिसाळ, प्रकाश झलवार, अमोल कारले, स्वप्नील शिंगारे, योगेश साळवे, आशिष कर्नावट, शुभम आहेर, आनंद साळवे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती…